पोलीस निरीक्षकासह दोघांवर खुनाचा गुन्हा
By Admin | Updated: May 8, 2017 04:24 IST2017-05-08T04:24:10+5:302017-05-08T04:24:10+5:30
पोलीस कोठडीतील मारहाणीत संशयिताच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने शनिवारी पोलीस निरीक्षकासह अन्य दोघांवर

पोलीस निरीक्षकासह दोघांवर खुनाचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पोलीस कोठडीतील मारहाणीत संशयिताच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने शनिवारी पोलीस निरीक्षकासह अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलीस निरीक्षक शेख अब्दुल रौफ यांच्या अधीनस्त असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी २५ डिसेंबर २०१६ रोजी समशेर खान समीर खान पठाण (३७) यास एका गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतले. त्याला नियमानुसार अटक केली नाही. परभणी शहरातील तीन गुन्ह्यांत त्याचा हात असावा, या संशयावरून समशेर खानला मारहाण करण्यात आली, त्यात त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भूमन्ना आचेवाड यांनी नानलपेठ पोलिसात फिर्याद दिली. त्याच्या आधारे शेख अब्दुल रौफ यांच्यासह हवालदार तुळशीदास देशमुख, पो.कॉ.अ. मुश्ताक अ.मजीद यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.