परभणी महानगरपालिकेच्या कारवाईत अडीच क्विंटल प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 16:01 IST2019-01-11T16:00:46+5:302019-01-11T16:01:20+5:30

संबंधित दुकानदाराकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Two-and-half quintals of plastic were seized in Parbhani Municipal Corporation's proceedings | परभणी महानगरपालिकेच्या कारवाईत अडीच क्विंटल प्लास्टिक जप्त

परभणी महानगरपालिकेच्या कारवाईत अडीच क्विंटल प्लास्टिक जप्त

परभणी- शहरात महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत अडीच क्विंटल प्लास्टिक कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या असून संबंधित दुकानदाराकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

कच्छी बाजार भागात मनपा उपायुक्त विद्या गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माथेकर, विनय ठाकूर, युवराज साबळे, कदम यांच्या पथकाने  शहरातील इतर किरकोळ विक्रेत्यांना प्लास्टिक बॅगचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याच्या दुकानावर धाड टाकून प्लास्टिक बंदी कायद्यांतर्गत अडीच क्विंटल प्लास्टिक कॅरिबॅग जप्त केल्या. त्यानंतर सदरील दुकानदाराकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मनपाच्या पथकाने गुरुवारीही याच भागात कारवाई करुन दोन व्यापाऱ्याकडून ३५ किलो प्लास्टिक कॅरिबॅग जप्त केल्या होत्या. या व्यापाऱ्याकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. 

Web Title: Two-and-half quintals of plastic were seized in Parbhani Municipal Corporation's proceedings