मागील वर्षभरात वीस हजार आठशे वाहनांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST2021-06-27T04:13:16+5:302021-06-27T04:13:16+5:30
परभणी शहर व परिसरात वाहतुकीचे नियम न पाळता वाहनधारक बिनधास्तपणे फिरतात. ही बाब लक्षात घेत, शहर वाहतूक शाखेच्या वतीने ...

मागील वर्षभरात वीस हजार आठशे वाहनांना दंड
परभणी शहर व परिसरात वाहतुकीचे नियम न पाळता वाहनधारक बिनधास्तपणे फिरतात. ही बाब लक्षात घेत, शहर वाहतूक शाखेच्या वतीने फिक्स पॉइंट तैनात करून मागील वर्षभरात वेगवेगळ्या कारवाई करण्यात आल्या. यामध्ये एकूण २० हजार ७७९ वाहनधारकांकडून ५३ लाख २४ हजार ८५० रुपये दंड वसूल करण्यात आला. यामध्ये अवैध वाहतूक करणारी २७६ वाहने, ड्रंक अँड ड्राइव्हच्या १२६ केसेस, विना हेल्मेट फिरणारे ११२, अतिवेगाने वाहन चालविणारी ४७७ वाहने, वाहनधारकांवर मोबाइलवर बोलणे ६१६, फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या ८१ वाहनांवर, नो पार्किंगमध्ये वाहने लावल्याने २,७०८ वाहनांवर, ट्रिपल सीट जाणाऱ्या ५३२ आणि मोठ्या आवाजात वाहने चालविणाऱ्या ५७ वाहनांवर ही कारवाई करण्यात आली. जानेवारी ते १५ जून या कालावधीत शहरात बारा लाख रुपयांचा दंड नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून वसूल करण्यात आला.
वाहतूक शाखेच्या वतीने शहरात दररोज मोहीम राबवून सर्व वाहनांची कागदपत्र तपासली जात आहेत. वाहनधारकांनी नियम पाळून सहकार्य करावे.
- सचिन इंगेवाड, सहायक पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, परभणी.