वीज कडाडताच मोबाइल करा बंद; झाडांपासून राहा दूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST2021-07-16T04:13:54+5:302021-07-16T04:13:54+5:30
पावसाळ्यात पाऊस पडण्यापूर्वी विजांचा कडकडाट सुरू होतो. त्यामुळे वीज पडण्याची शक्यता सर्वसामान्यपणे लक्षात येते. मोबाइलच्या लहरींमुळे वीज अंगावर पडण्याची ...

वीज कडाडताच मोबाइल करा बंद; झाडांपासून राहा दूर!
पावसाळ्यात पाऊस पडण्यापूर्वी विजांचा कडकडाट सुरू होतो. त्यामुळे वीज पडण्याची शक्यता सर्वसामान्यपणे लक्षात येते. मोबाइलच्या लहरींमुळे वीज अंगावर पडण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे झाडांवर वीज पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा काळात नागरिकांनी मोबाइल बंद ठेवावा व पावसात झाडांचा सहारा घेणे टाळावे.
वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...
वीज कडाडत असताना घराबाहेर असाल तर सर्वप्रथम मोबाइल स्वीच ऑफ करा, झाडाखाली थांबणे टाळावे, शक्यतो पावसात शेतात काम करू नये, जनावरांना उघड्यावर न ठेवता गोठ्यात बांधून ठेवले पाहिजे. सुरक्षित ठिकाणी थांबून काळजी घेतली पाहिजे.
३२ लाख रुपयांची नुकसानभरपाई
वीज अंगावर पडून दगावल्यास संबंधितास शासनाकडून ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळते.
चार वर्षांत जिल्ह्यात वीज पडून मृत्यू पावल्याच्या ११ घटना घडल्या आहेत.
प्रशासनाने ८ जणांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख मदत दिली आहे.
शासकीय इमारतींवरच वीजरोधके....
१ जिल्ह्यात केवळ शासकीय इमारतींवरच काही वीजरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.
२ खासगी क्षेत्रातील मोठ्या व्यावसायिक इमारतींवर मात्र ही यंत्रणा उभारण्याचे टाळले जाते.
३ जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विद्यापीठ कार्यालय, टेलिफोन भवन अशा मोजक्याच इमारतींवर ही यंत्रणा आहे.
पावसापूर्वी विजा कडाडतात. त्यामुळे पावसात शेतीची कामे शक्यतो करू नयेत. पावसापासून बचाव करण्यासाठी झाडांचा सहारा घेऊ नये. दामिनी ॲप वापरल्यास अधिक सोयीचे होते.
- डॉ. के.के. डाखोरे, हवामान तज्ज्ञ, परभणी