ट्रँक कार्यालय परिसरात तर चाचणी एमआयडीसीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:34+5:302021-07-18T04:13:34+5:30
परभणी शहरात दररोज १५० ते २०० वाहनधारकांना शिकाऊ तसेच कायमस्वरूपी वाहन परवाना देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात तयार ...

ट्रँक कार्यालय परिसरात तर चाचणी एमआयडीसीत
परभणी शहरात दररोज १५० ते २०० वाहनधारकांना शिकाऊ तसेच कायमस्वरूपी वाहन परवाना देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात तयार केलेल्या ट्रँकवर चाचणी घेतली जाते. यानुसार शनिवारी काही चाचण्या एमआयडीसी परिसरातील मोकळ्या रस्त्यावर सकाळी ८ ते दुपारी १२.३० च्या दरम्यान घेण्यात आल्या. काही वेळ आरटीओचे तपासणी अधिकारी उपस्थित होते. मात्र, यानंतर सर्व कारभार काही एजंटनी सांभाळला. चारचाकी वाहनाचा शिकाऊ परवाना काढण्यासाठी खासगी मोटार वाहन परवाना केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अनेक युवकांसह नागरिकांना शिकाऊ परवान्यासाठी शहरातील कार्यालय सोडून एमआयडीसीला फेरा मारावा लागला.
सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाहन चाचणी घेण्याचा नियम आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी २५० चाचण्यांचे नियोजन तीन ठिकाणी करण्यात आले होते. त्यानुसार एमआयडीसीत चाचण्या घेण्यात आल्या.
- श्रीकृष्ण नकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी.
-----------------------------
सूचना- (ट्रँक हे बरोबर आहे का? )
---------------------