ट्रक चालकाने साडेदहा लाखांचे सोयाबीन केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:31 IST2021-03-13T04:31:45+5:302021-03-13T04:31:45+5:30

पेडगाव येथील बालाजी ट्रेडिंग कंपनी येथून ८ मार्च रोजी सायंकाळी ७.३०च्या सुमारास एमएच ४२बी ७४८५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये १० लाख ...

The truck driver sold soybeans worth Rs 1.5 lakh to Lampas | ट्रक चालकाने साडेदहा लाखांचे सोयाबीन केले लंपास

ट्रक चालकाने साडेदहा लाखांचे सोयाबीन केले लंपास

पेडगाव येथील बालाजी ट्रेडिंग कंपनी येथून ८ मार्च रोजी सायंकाळी ७.३०च्या सुमारास एमएच ४२बी ७४८५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये १० लाख ६१ हजार २७० रुपयांचे सोयाबीनचे ४६७ कट्टे भरण्यात आले होते. हे सोयाबीन सोलापूर येथे पोहोचवायचे होते. पेडगाव येथून निघालेला ट्रक दुसऱ्या दिवशी सोलापूर येथे पोहोचला नाही. याबाबतची माहिती बालाजी ट्रेडिंग कंपनीचे मालक गोविंद अजमेरा यांना मिळाल्यानंतर, त्यांनी ट्रक चालक विष्णू रघू सुर्वे याच्याशी संपर्क साधला असता, त्याचा फोन बंद होता. त्यामुळे अजमेरा यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालकासह मालकाने संगनमत करून १० लाख ६१ हजार २७० रुपयांच्या सोयाबीन मालाचा अपहार करत फसवणूक केल्याचेही फिर्याद दिली. त्यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: The truck driver sold soybeans worth Rs 1.5 lakh to Lampas