झरी येथे वृक्षलागवड महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST2021-07-26T04:17:48+5:302021-07-26T04:17:48+5:30
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह गंगाजी जगाडे, कांतराव देशमुख, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश ...

झरी येथे वृक्षलागवड महोत्सव
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह गंगाजी जगाडे, कांतराव देशमुख, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, गजानन देशमुख, दीपक देशमुख, विस्तार अधिकारी स्वप्नील पवार, जी.एम. गोरे, गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी टाकसाळे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३ केव्ही वीज उपकेंद्र, स्मशानभूमी परिसर, तसेच गावातील शॉपिंग सेंटर परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. कांतराव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मार्गदर्शन करताना टाकसाळे म्हणाले, वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात केल्यास ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, तसेच आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. तेव्हा लावलेली झाडे जोपासावीत, असे आवाहन त्यांनी केले. पेदेवाड यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामसेवक सतीश बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास ग्रामस्थ उपस्थित होते.