ऑक्सिजन खाटांवर २७६ रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST2021-05-26T04:18:39+5:302021-05-26T04:18:39+5:30

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाने कोविड ...

Treatment of 276 patients on oxygen beds | ऑक्सिजन खाटांवर २७६ रुग्णांवर उपचार

ऑक्सिजन खाटांवर २७६ रुग्णांवर उपचार

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाने कोविड रुग्णालयांमध्ये १ हजार ४१ खाटांची सुविधा केले आहे. त्यापैकी अतिदक्षता विभागातील ऑक्सिजन खाटांवर १३४ आणि व्हेंटिलेटरवर ३१ रुग्ण उपचार घेत आहेत. या विभागात ३५३ खाटा रिक्त आहेत. अतिदक्षता विभागाव्यतिरिक्त निर्माण केलेल्या ऑक्सिजन खाटांवर १४२ रुग्ण उपचार घेत असून, ३८१ ऑक्सिजन खाटा रिक्त आहेत. कोविड रुग्णालयात सर्वसाधारण खाटांवर सध्या ३० रुग्ण उपचार घेत असून, या रुग्णालयांमधील २६९ खाटा रिक्त आहेत. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये १ हजार ५६७ एकूण खाटा असून, त्यापैकी ४६८ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. तर १ हजार ९९ खाटा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे कोरोना केअर केंद्रामध्ये १ हजार ५६७ खाटा उपलब्ध असून, ४६८ रुग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ९९ खाटा केअर सेंटरमध्ये रिक्त आहेत. कोविड रुग्णालय आणि कोरोना केअर केंद्रांत मिळून ३ हजार ८४० खाटा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ७०६ खाटांवर रुग्ण उपचार घेत असून, ३ हजार १३४ खाटा रिक्त आहेत.

Web Title: Treatment of 276 patients on oxygen beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.