ट्रॅव्हल्स चालक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST2021-04-22T04:17:53+5:302021-04-22T04:17:53+5:30
लघु विक्रेते अडचणीत परभणी : जिल्ह्यातील लघु विक्रेत्यांचे व्यवसाय ठप्प असल्याने ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत. मागील महिनाभरापासून ...

ट्रॅव्हल्स चालक अडचणीत
लघु विक्रेते अडचणीत
परभणी : जिल्ह्यातील लघु विक्रेत्यांचे व्यवसाय ठप्प असल्याने ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत. मागील महिनाभरापासून आठवडी बाजार बंद आहे. परिणामी या व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे.
स्वच्छतागृह बंद
परभणी : येथील प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृह बंद असल्याने अधिकारी- कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. हे स्वच्छतागृह सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
गंगाखेड रस्त्याला तडे
परभणी : गंगाखेड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर सिमेंट काँँक्रीट रस्ता तयार करण्यात आला असून, या रस्त्याला ब्राह्मणगाव ते उमरी फाटा यादरम्यान तडे गेले आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जावर शंका उपस्थित होत आहे.
फळांची आवक वाढली
परभणी : शहरातील बाजारपेठेत फळांची आवक वाढली आहे. उन्हाळ्यात टरबूज, खरबुजांना मागणी वाढते. ही बाब लक्षात घेऊन खरबूज आणि टरबुजांची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे चिकू, आंबा ही फळेही विक्रीसाठी दाखल झाली आहेत.