पाइपलाइन फुटल्याने वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:34 IST2020-12-12T04:34:09+5:302020-12-12T04:34:09+5:30
पालम शहराला गोदावरी नदीपात्रातून पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन मागील आठ दिवसांपासून सोमेश्वर येथे फुटली आहे. त्यामुळे चार गावांसह ऊस नेणाऱ्या ...

पाइपलाइन फुटल्याने वाहतुकीस अडथळा
पालम शहराला गोदावरी नदीपात्रातून पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन मागील आठ दिवसांपासून सोमेश्वर येथे फुटली आहे. त्यामुळे चार गावांसह ऊस नेणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
पालम शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपंचायतीने गोदावरी नदीच्या काठावर सोमेश्वर येथून शहरापर्यंत पाइपलाइन केलेली आहे; पण या पाइपलाइनच्या देखभालीकडे नगरपंचायतीचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. पाइपलाईन रस्त्यालगतच असल्याने या भागातील वाहनांसाठी ही नेहमीचीच डोकेदुखी बनली आहे. सोमेश्वर येथे पुलानजीक मागील ८ दिवसांपूर्वी पाइप फुटून रस्त्यावर पाणी साचून चिखल निर्माण झाला आहे. या चिखलात वाढ होत आहे. गोदाकाठावर ऊसतोड सुरू झाली आहे. उसाने भरलेली वाहने या चिखलात फसून बसत आहेत, तसेच सोमेश्वर, आरखेड, उमरथडी या गावांतील प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना त्रास होत आहे. नगरपंचायतीने दुरुस्तीकडे पाठविली फिरवत आहे.