दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार मोंढ्यातील व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST2021-04-16T04:16:26+5:302021-04-16T04:16:26+5:30
जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी मोंढा बाजारपेठेतील ...

दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार मोंढ्यातील व्यवहार
जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी मोंढा बाजारपेठेतील व्यवहारांना मात्र मुभा दिली आहे. सध्या या बाजारपेठेमध्ये ग्राहकांची संख्या कमी आहे. १ मेपासून बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. तसेच गर्दीही वाढते. सध्या वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेऊन येथील व्यापाऱ्यांनी मोंढा बाजारपेठेतील व्यवहार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी याच कालावधीत आपले व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानोबा कारेगावकर, कार्याध्यक्ष रमेशराव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र अग्रवाल आणि सचिव डी. एम. शिरफुले यांनी केले आहे.
मोंढा बाजारपेठेतील व्यापार्यांच्या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठ दुपारी २ वाजेनंतर बंद राहणार आहे. दिवसभर बाजारपेठ सुरू ठेवल्याने कोरोना संसर्ग वाढेल, ही भीती लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.