दुकान बंद करण्यावरून व्यापाऱ्याची पोलिसाशी बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST2021-07-24T04:13:02+5:302021-07-24T04:13:02+5:30
शहरात सर्व दुकानांना दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. यानंतरही काही दुकाने सुरू राहत असल्याने नानलपेठ पोलीस ठाण्याचे ...

दुकान बंद करण्यावरून व्यापाऱ्याची पोलिसाशी बाचाबाची
शहरात सर्व दुकानांना दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. यानंतरही काही दुकाने सुरू राहत असल्याने नानलपेठ पोलीस ठाण्याचे बीट मार्शल अपना काॅर्नर भागातील जुन्या भाजीपाला बीट मार्केट भागात गस्त घालत होते. यावेळी परिसरातील काही दुकाने सुरू होती. यातील एका मोबाइल व अन्य साहित्याचे दुकान सुरू असल्याने दुकान बंद करावे, असे पोलिसांनी दुकानदारास सांगितले. मात्र, व्यापाऱ्याने व एका ग्राहकाने पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घातला. यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. ही माहिती पोलीस कर्मचाऱ्याने वायरलेसने पोलीस कंट्रोल रूमला कळविली. यानंतर पोलीस अधीक्षक जयंती मीना यांच्यासह तीन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या दहा मिनिटात ग्रॅण्ड काॅर्नर, अपना काॅर्नर, जनता मार्केट, गुजरी बाजार यासह भाजीपाला बीट मार्केट परिसरात पोलीस अधीक्षकांनी स्वत: फिरून क्यूआरटी पथक, आरसीपी प्लाटून तैनात केले. यानंतर परिसरातील सर्व दुकाने पोलिसांनी बंद करून फिक्स पॉइंट लावले होते. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलीस कर्मचाऱ्याशी बाचाबाची करीत झटापट झाल्याचे काहींनी सांगितले.