स्वच्छतागृह बनले गैरसोयीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST2021-02-10T04:17:37+5:302021-02-10T04:17:37+5:30
शहरात विरुद्ध बाजूने वाहतूक परभणी : शहरात अनेक रस्त्यांवर वाहनधारक विरुद्ध बाजूने वाहतूक करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा नित्याचा झाला ...

स्वच्छतागृह बनले गैरसोयीचे
शहरात विरुद्ध बाजूने वाहतूक
परभणी : शहरात अनेक रस्त्यांवर वाहनधारक विरुद्ध बाजूने वाहतूक करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा नित्याचा झाला आहे. वाहतूक शाखेकडून याविरुद्ध कारवाई होत नसल्याने हा प्रकार बळावला आहे. विशेष म्हणजे, बाजारपेठ भागातील रस्ते अरुंद असून, त्यावरून या रस्त्यावरून एकेरी वाहतूक केली जाते. मात्र, वाहनधारक दोन्ही बाजूने वाहतूक करतात. त्यामुळे अनेक वेळा वाहतूककोंडी होते. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सरपंच निवडींमुळे तापले वातावरण
परभणी : जिल्ह्यात ग्रामीण भागात सरपंचपदाच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. सरपंचपदाच्या निवडीसाठी गावा-गावात ग्रामसभा घेतल्या जात असून, सरपंच निवडीनंतर समर्थक मंडळी जल्लोष करीत आहेत. १२ फेब्रुवारीपर्यंत सरपंच निवडीचा कार्यक्रम चालणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील वातावरण तापले आहे.
कार्यालयासमोर वाहनांचा गराडा
परभणी : येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोरच वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना वाहनांचा अडथळा पार करावा लागतो. याच परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या कार्यालयात जाण्यासाठी वाहनांचा अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक शाखेने या भागातील वाहनधारकांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.
उड्डाणपुलाचे काम संथगतीने
परभणी : येथील रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या विद्यापीठ गेट परिसरात उड्डाणपूल उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. वर्षभरापासून हे काम सुरू आहे. त्यामुळे येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काम संथगतीने होत असल्याने आणखी किती काळ हा रस्ता बंद ठेवणार? असा सवाल वाहनधारक उपस्थित करीत आहेत.