वनविभागात काम करणाऱ्या १० मजुरांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:05+5:302021-07-16T04:14:05+5:30
सेलू तालुका वनविभागअंतर्गत रवळगाव ते बोरगाव, आहेर बोरगाव ते शिंदे टाकळी, रायपूर ते निरवाडी, खैरी ते गिरगाव या रस्त्यावर ...

वनविभागात काम करणाऱ्या १० मजुरांवर उपासमारीची वेळ
सेलू तालुका वनविभागअंतर्गत रवळगाव ते बोरगाव, आहेर बोरगाव ते शिंदे टाकळी, रायपूर ते निरवाडी, खैरी ते गिरगाव या रस्त्यावर तर करजखेडा ते घोडके पिंपरी, वालूर ते ब्राह्मणगाव, मोरेगांव ते वालूर, ब्राह्मणगाव ते वालूर कालवा आणि कान्हड गायरान या वनविभागाच्या साइटवर चार वर्षांपासून हे मजूर काम करीत आहेत. या १० मजुरांची जुलै २०२० पासूनची मजुरी अद्यापही मिळाली नाही. विशेषतः या मजुरांनी सांगितले, आम्ही काम केलेला कालावधी अहवाल ऑनलाइनवरसुध्दा विभागाने टाकला आहे. मजुरीसाठी वेळोवेळी तालुका कार्यालयात येतो, पण येथे लागवड अधिकारी हजर राहत नाहीत. त्यांना मोबाइलवर संपर्क केला तर ते मोबाइल घेत नाहीत आणि घेतला तर उडवाउडवीची उत्तरे देतात, अशी व्यथा मजुरांनी सोमवारी मांडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष देऊन मजुरांची मजुरी अदा करावी, अशी मागणी केली जात आहे.
लागवड अधिकाऱ्यांचा संपर्क होईना
याप्रकरणी लागवड अधिकारी दुधारे यांना सोमवारी मोबाइलवर तीन वेळा संपर्क केला, पण त्यांनी मोबाइल उचलला नाही.
या मजुरांची मजुरी थकली
ज्ञानेश्वर वाघमारे, गोविंद नन्नवरे, हसरत पठाण, मुश्रफ पठाण, अलताफ पठाण, मकसद पठाण, शेख पुतलेद, सय्यद अतिख, दत्तात्रय कासार, लक्ष्मण जामकर.