पाथरीत दरोडेखोरांचा धुमाकूळ: तिघांवर हल्ला, पाच घरे फोडली
By Admin | Updated: October 29, 2016 13:19 IST2016-10-29T13:19:02+5:302016-10-29T13:19:02+5:30
जिल्ह्यातील पाथरी शहरातील आदर्शनगर भागात शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास दहा ते बारा दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून पाच घरे फोडली

पाथरीत दरोडेखोरांचा धुमाकूळ: तिघांवर हल्ला, पाच घरे फोडली
>ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 29 - जिल्ह्यातील पाथरी शहरातील आदर्शनगर भागात शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास दहा ते बारा दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून पाच घरे फोडली. दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या तिघांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये सुनील वसंत नारलावार यांच्यावर दरोडेखोराने चाकू हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पाथरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी दरोडेखोरांनी १ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज लुटला. घटनास्थळास पोलिस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, उपाधीक्षक रेणुका वागळे यांनी भेट देऊन पाहणी केली.