परभणीतून तिघांची दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST2021-08-24T04:22:58+5:302021-08-24T04:22:58+5:30

शहरातील विश्वनाथ बापुराव लोखंडे यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच २२एल ७५३३) दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता एचडीएनसी ...

Three-wheeler lampas from Parbhani | परभणीतून तिघांची दुचाकी लंपास

परभणीतून तिघांची दुचाकी लंपास

शहरातील विश्वनाथ बापुराव लोखंडे यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच २२एल ७५३३) दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता एचडीएनसी बॅंकेसमोर उभी केली होती. दुपारी २च्या सुमारास त्यांची दुचाकी जागेवर दिसून आली नाही. याबाबत लोखंडे यांनी १९ ऑगस्ट रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना लोकाशानगर भागात घडली. या भागातील रहिवासी देवेंद्रसिंह अंगदसिंह गौतम यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच २२ ए ६९९३) दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या घरासमोर उभी केली होती. सकाळी ११च्या सुमारास दुचाकी जागेवरून गायब असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी घटना जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घडली. झरी येथील रामेश्वर ज्ञानोबा जगाडे यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच २२ एसी ३३५४) दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२च्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात उभी केली होती. दवाखान्यात एका मित्रास भेटून ते दुपारी १.३० च्या सुमारास दवाखान्याबाहेर आले असता त्यांची दुचाकी जागेवर दिसली नाही. याबाबत त्यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Three-wheeler lampas from Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.