आयपीएलवर सट्टा लावणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST2021-04-15T04:16:19+5:302021-04-15T04:16:19+5:30
आयपीएल क्रिकेट सुरू झाले असून, त्यावर सट्टा लावण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहेत. परभणी तालुक्यातील भारस्वाडा येथे काहीजण आयपीएलवर सट्टा ...

आयपीएलवर सट्टा लावणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात
आयपीएल क्रिकेट सुरू झाले असून, त्यावर सट्टा लावण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहेत. परभणी तालुक्यातील भारस्वाडा येथे काहीजण आयपीएलवर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे १३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. भारस्वाडा येथील शेतातील आखाड्यावर छापा मारून ही कारवाई करण्यात आली. त्यात सट्टा लावण्यासाठी वापरले जाणारे मोबाईल, एक दुचाकी आणि रोख ५ हजार ४० रुपये असा ७७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तीनही आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया बुधवारी उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, अझहर पटेल, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, दीपक मुंडे यांच्या पथकाने केली.