परभणी जिल्ह्यात वीज पडून तिघे दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST2021-05-03T04:12:43+5:302021-05-03T04:12:43+5:30
२ मे रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. यावेळी परभणी तालुक्यातील ठोळा येथे दोन मेंढपाळ ...

परभणी जिल्ह्यात वीज पडून तिघे दगावले
२ मे रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. यावेळी परभणी तालुक्यातील ठोळा येथे दोन मेंढपाळ गावाकडे परत जात असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. यात दोघांचाही मृत्यू झाला. मृत्यू पावलेले दोघेही ११ व १४ वर्षांची मुले असल्याची माहिती तहसीलदार संजय बिरादार यांनी दिली. तसेच सोनपेठ तालुक्यातील आवलगाव शिवारात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वीज पडून एकाचा मृत्यू झाला. तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. त्यात वंदन येथील गंगाधर रामभाऊ होरगुळे (वय ५५) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच याच परिसरात एक बैल ठार झाला आहे. तसेच पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव येथील कुशाबा उत्तमराव शिंदे यांच्या शेतात वीज पडली. त्यात आखाड्यावर बांधलेला एक बैल ठार झाला, तर पांडुरंग मुगाजी मुलगीर यांच्या शेतात वीज पडून एक बैल ठार झाल्याची घटना घडली आहे. सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथेही वादळी वाऱ्यात वीज पडून एक बैल दगावल्याची घटना घडली.