परभणी येथे बसवरील दगडफेक प्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 19:16 IST2018-07-21T19:14:55+5:302018-07-21T19:16:26+5:30
बोरी येथे शुक्रवारी सायंकाळी जिंतूर-परभणी महामार्गावर चार बसवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

परभणी येथे बसवरील दगडफेक प्रकरणी तिघांना अटक
परभणी : बोरी येथे शुक्रवारी सायंकाळी जिंतूर-परभणी महामार्गावर चार बसवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
शुक्रवारी सायंकाळी जिंतूर-परभणी महामार्गावर चार बसवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी बस चालक संदीप घुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सपोनि व्यंकटेश आलेवार यांनी तात्काळ तपास करून तिघांना ताब्यात घेतले. अटकेमध्ये बोरी येथील पवन विलास चौधरी व वर्णे येथील अजिंक्य भोसले, कसर येथील स्वप्नील मगर यांचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक व्हि.एस. खोले, जमादार व्हि.एम. गिरी, पोकॉ. सुनील गिरी हे करत आहेत.