शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

तीन वाहनचालकांना लिपिकपदावर पदोन्नती, सुधारित नियमाने प्रथमच चालकांना मिळाली बढतीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 15:47 IST

वर्ग ४ कर्मचा-यांना वर्ग ३ पदावर पदोन्नती देण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वी सर्वसाधारणपणे शिपाई पदावरील कर्मचा-यांना वर्ग ३ पदावर पदोन्नती दिली जात होती.

ठळक मुद्दे६ जून २०१७ रोजी राज्य शासनाने अद्यादेश काढून शिपायांप्रमाणेच चालकपदावरील कर्मचा-यांनाही पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला

परभणी :   जिल्हा प्रशासनातील तीन वाहनचालकांना लिपीक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे शिपाई प्रवर्गातून लिपीक पदी पदोन्नती दिली जाते. मात्र शासनाच्या नव्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने तीन चालकांना पदोन्नतीची संधी दिली आहे. 

वर्ग ४ कर्मचा-यांना वर्ग ३ पदावर पदोन्नती देण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वी सर्वसाधारणपणे शिपाई पदावरील कर्मचा-यांना वर्ग ३ पदावर पदोन्नती दिली जात होती. ६ जून २०१७ रोजी राज्य शासनाने अद्यादेश काढून शिपायांप्रमाणेच चालकपदावरील कर्मचा-यांनाही पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा पहिला लाभ परभणी जिल्ह्यातील तीन चालकांना झाला आहे. 

कर्मचा-यांना पदोन्नती देण्यासाठी ११ आॅक्टोबर रोजी जिल्हा पदोन्नती निवड समितीची आणि त्यानंतर १७ आॅक्टोबर रोजी विभागीय पदोन्नती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तीन चालकांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार परभणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वाहन चालक सुनील दत्तराव चाफळे, गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वाहन चालक सिद्धेश्वर श्रीमंतराव फड आणि पूर्णा तहसील कार्यालयातील प्रदीप रामराव जोगदंड या तीन चालकांना लिपीक म्हणून पदोन्नती देण्यात आली. सुनील चाफळे यांना गंगाखेड तहसील कार्यालय, सिद्धेश्वर फड यांना पालम तहसील कार्यालय आणि प्रदीप जोगदंड यांना पूर्णा येथील तहसील कार्यालयात लिपीक म्हणून नियुक्ती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी काढले आहेत. 

पदोन्नतीसाठी असलेल्या अटीचालक पदावरुन लिपीक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार चालक पदावर कर्मचा-याने किमान तीन वर्षापेक्षा अधिक नियमित सेवा केलेली असावी, कर्मचारी हा किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतलेला असावा, या पात्रता निश्चित करण्यात आल्या असून या कर्मचा-यांना कायमस्वरुपी लिपीक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. शासनाच्या आदेशामध्ये लिपीक पदी पदोन्नती देताना कर्मचा-याच्या इच्छेलाही महत्त्व दिले असून त्याची इच्छा असेल तरच पदोन्नती द्यावी, असेही म्हटले आहे.

दोन शिपायांनाही पदोन्नतीचा लाभजिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर काम करणाºया दोन कर्मचा-यांनाही लिपीक म्हणून नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. त्यात स्वाती संतराम डोंगरे आणि प्रदीप शालीकराम मुनेश्वर यांना पदोन्नती देण्यात आली असून डोंगरे यांची मानवत तहसील कार्यालयात तर मुनेश्वर यांची सेलू तहसील कार्यालयात लिपीक पदी नियुक्ती केल्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत.