शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 13:14 IST

सेलू ते मानवत रोड महामार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीने समोरून येत असलेल्या दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्देयात्रेवरून परतणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास निपाणी टाकळी पाटीजवळ हा अपघात घडला.सिध्दार्थ शेषेराव मगर, अविनाश महादेव मकासरे, सिध्दार्थ आसाराम दवंडे हे तिघेजण जागीच ठार झाले

सेलू - यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सेलू ते मानवत रोड महामार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीने समोरून येत असलेल्या दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास निपाणी टाकळी पाटीजवळ हा अपघात घडला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील चार जण सेलू येथे सुरू असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेनिमित्त आलेले विविध कार्यक्रम  पाहण्यासाठी शनिवारी रात्री सेलूत आले होते. यात्रा आटोपून दुचाकीवरून ढेंगळी पिंपळगाव कडे जात असताना निपाणी टाकळी पाटीजवळ परभणीकडून सेलूकडे भरधाव वेगात  येत असलेल्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक (एम.एच.22 यु 8222) ने समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील सिध्दार्थ शेषेराव मगर (28), अविनाश महादेव मकासरे (30), सिध्दार्थ आसाराम दवंडे (30)हे तिघेजण जागीच ठार झाले तर कुलदीप आसाराम पंडागळे(28) हा गंभीर जखमी (सर्व रा. ढेंगळी पिंपळगाव ता.सेलू जि.परभणी)  झाला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूParbhani policeपरभणी पोलीस