शहरातील विष्णूनगरमधून नागनाथ दळवे यांची दुचाकी व मोबाईल २२ नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी पळविली होता. तसेच तालुक्यातील तिडीपिंपळगाव येथील वैजनाथ थटवले यांची दुचाकी ५ एप्रिल रोजी शेतातून चोरली होती. सेलू पोलीस पथकाने सिमूरगव्हाण येथून प्रशिक राजेश कदम यास २८ डिसेंबर रोजी ताब्यात घेऊन येथील दौलताबाद येथील चोरलेली दुचाकी हस्तगत केली. तसेच आरोपी प्रशिक यांच्या अल्पवयीन साथीदाराकडे आणखी चोरलेल्या दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर औरंगाबाद येथील रांजणगाव येथून एका अल्पवयीन आरोपीस ३० डिसेंबर रोजी पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स्टे. सेलू येथील पोलीस कर्मचारी अनंत थोरवट, रहीम, बाळू पुराणवाड, उमेश बारहाते यांनी दुचाकीसह आरोपीला ताब्यात घेतले.
चोरलेल्या आरोपीसह तीन दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:15 IST