वीज चोरी प्रकरणी सेलूत तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST2021-09-02T04:39:23+5:302021-09-02T04:39:23+5:30
आकडे टाकून वीज चोरी केल्याची अन्य एक घटनाही सेलूतच घडली. शहरातील लक्कडकोट भागात महावितरणचे कर्मचारी विजेचे मीटर तपासत असताना ...

वीज चोरी प्रकरणी सेलूत तिघांवर गुन्हा
आकडे टाकून वीज चोरी केल्याची अन्य एक घटनाही सेलूतच घडली. शहरातील लक्कडकोट भागात महावितरणचे कर्मचारी विजेचे मीटर तपासत असताना वीज ग्राहक राजू पंडित टाके व वापरकर्ते गजानन पंडित टाके यांनी आकडे टाकून अनाधिकृत वीज जोडणी घेतल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी ३० हजार ३३० रुपयांची वीज चोरी केल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना तडजोडीचे १० हजार व वीज चोरीची रक्कम असा एकूण ४० हजार ३३० रुपयांची रक्कम भरण्यास सांगण्यात आले; परंतु त्यांनी ही रक्कम भरली नाही. त्यामुळे उपकार्यकारी अभियंता पप्पू गोरे यांनी सेलू पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली. त्यावरून राजू पंडित टाके व गजानन पंडित टाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.