खैरी येथील खूनप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST2021-05-15T04:16:52+5:302021-05-15T04:16:52+5:30
सेलू तालुक्यातील खैरी येथील एका विवाहित महिलेसोबत प्रेम करणाऱ्या जालना जिल्ह्यातील पिंपळवाडी येथील संतोष डिघोळे या तरुणाने सोशल मीडियावर ...

खैरी येथील खूनप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी
सेलू तालुक्यातील खैरी येथील एका विवाहित महिलेसोबत प्रेम करणाऱ्या जालना जिल्ह्यातील पिंपळवाडी येथील संतोष डिघोळे या तरुणाने सोशल मीडियावर अश्लील फोटो टाकल्याचा राग मनात धरून विवाहितेच्या नातेवाईकांनी संतोष डिघोळे यास खैरी येथे बोलावून घेत खून केला होता. ही घटना १२ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात १३ मे रोजी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यानुसार आरोपी विवाहित महिला शिल्पा उध्दवराव घूगे, महिलेचा भाऊ रंगनाथ उध्दवराव घूगे व महिलेचे वडील उध्दवराव शामराव घूगे यांना चारठाणा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मानवत न्यायालयात १४ मे रोजी हजर केले होते. न्यायालयाने या तिघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अलापूरकर यांनी दिली.