तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST2021-08-23T04:21:01+5:302021-08-23T04:21:01+5:30
आपण वापरत असलेला मोबाइल आणि वाहनाच्या नोंदणी वेळी दिलेला मोबाइल क्रमांक वेगळा असेल तर दंड लागल्यानंतर मोबाइल नंबरच्या चुकीमुळे ...

तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना?
आपण वापरत असलेला मोबाइल आणि वाहनाच्या नोंदणी वेळी दिलेला मोबाइल क्रमांक वेगळा असेल तर दंड लागल्यानंतर मोबाइल नंबरच्या चुकीमुळे चलान मिळत नाही. यात वाहनाची विक्री किंवा दुसऱ्याच्या नावे वाहन करण्यासाठीची प्रक्रिया करताना पूर्वीची सर्व दंडाची रक्कम भरल्याशिवाय वाहन हस्तांतरित करता येत नाही. यामुळे वेळीच आपला मोबाइल क्रमांक वाहनाला जोडून घ्या व त्यावर किती दंड लागला आहे, याची तपासणी करणे गरजेचे आहे.
कसे फाडले जाते ई-चलान?
शहर वाहतूक शाखेच्या वतीने कार्यरत असलेल्या सर्व वाहतूक पोलिसांना ई-चलानचे मशीन देण्यात आले आहे. परभणी शहरात २०१८ पासून ई-चलान पद्धतीद्वारे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना दंड लावला जातो. यामध्ये संबंधित वाहनधारकाच्या वाहनावरील समोरील किंवा मागील बाजूस असलेल्या नंबर प्लेटवरील नंबरचा फोटो काढून त्या नंबरचे वाहन ज्याच्या नावे आहे, त्याच्या नावाने तो दंड फाडला जातो. या दंडाचा एसएमएस फोटो काढल्यानंतर संबंधिताच्या मोबाइलवर पाठविला जातो. त्यानुसार पंधरा दिवसांत हा दंड भरणे बंधनकारक असते.
मोबाइल अपडेट केला आहे का?
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन खरेदी केल्यानंतर नोंदणीला गेल्यावर तेथे आपल्या मोबाइल नंबरची नोंदणी करणे आवश्यक आहे. जो मोबाइल नंबर आपण वापरतो तोच मोबाइल नंबर या कार्यालयात नोंदणीकृत करावा. जेणेकरून वाहन चालविताना नियम मोडल्यानंतर लावलेला दंड किंवा अपघात तसेच वाहन चोरीस गेल्यानंतर संबंधित वाहनाचा शोध घेणे यासाठी मोबाइल नंबरचा उपयोग होऊ शकतो. मात्र, अनेक जण बंद असलेले किंवा चुकीचे मोबाइल नंबर देतात, तर काही जण मोबाइल नंबरची नोंदणी करतच नाहीत.
दंडाची थकबाकी वाढली
दुचाकी असो की चारचाकी, सर्व वाहनांना ई-चलानद्वारेच दंड लावला जातो. वेगवेगळ्या कलमान्वये दंडाची रक्कम ठरवून दिली आहे. त्यानुसार नियम मोडल्यानंतर जे कलम लावले आहे, त्याचा दंड लावला जातो. पहिल्यांदाच नियम मोडला असेल तर १५ दिवसांचा कालावधी दंड भरण्यासाठी असतो. आपल्या मोबाइलवर आलेल्या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवरून दंड भरता येतो. मात्र, अनेक जण हा दंड वेळेत भरत नाहीत. यानंतरही पुन्हा बऱ्याच वेळेला चलान फाडले जाते. परंतु, दंड भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. यातून पोलिसांना वाहन पकडल्यानंतर दंडाची रक्कम न भरल्याचे आढळल्यास ते वाहन जप्त करण्याचा अधिकार दिला आहे.
ई-चलानद्वारे झालेला दंड
२०२० ५३ लाख २४ हजार ८५० रुपये
२०२१ जानेवारी ते जून १२ लाख