शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेले निम्नदुधना धरण दोन दिवसांत ७० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी होणार विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 11:28 IST

पाठबंधारे कार्यकारी अभियंता यांचे परभणी जिल्हाधिकाऱ्यांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत पत्र.

- रेवणअप्पा साळेगावकरसेलू (परभणी) : दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. तर केवळ २४.१० टक्के पाणीपातळीतील तहानलेल्या निम्न दुधना प्रकल्पात सोमवारी सकाळी १० वा.पर्यंत ७०.८५ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता नदिपात्रात केंव्हाही पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर  प्रकल्पाच्याखाली नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्याबाबत जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु. भी. कोरके यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कळविले आहे.

३१ ऑगस्ट रोजी शनीवारी  निम्न दुधना प्रकल्पात २४.१० टक्के जिवंत पाणीसाठा होता. शनीवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. रवीवारी पावसाने चांगलाच जोर धरला.रवीवारी सायंकाळपर्यंत पाणीपातळी २६.४४ टक्यावर गेली. सोमवारी सकाळी ६ वाजता जीवंत जलसाठा ६१.९३ टक्यावर गेला. तो सकाळी ८ वा ६६.५१ टक्केवरून १० वाजता ७०.८५ टक्के असा आहे. दोन दिवसात जवळपास ४६ टक्के पाणी वाढले. तर दुसरीकडं पाणलोट क्षेत्रात काही ठिकाणी भुसंपादना अभावी मावेजा मिळाला नसल्याने यादरम्यान शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन या धरणात पाणी साठवण क्षमता १०० वरुन ७५ टक्यावर आणलेली आहे. त्यामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ४ टक्के पाणीसाठा लागणार आहे. पाऊस सुरूच राहीला तर हे धरण ७५ टक्के भरेल. या पार्श्वभूमीवर सांडवा किंवा नदिपात्रात केंव्हाही पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. पुर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रकल्पाच्याखाली नदीकाठच्या गावांतील नागरीकांनी नदीपात्रात जाऊ नये, आपापल्या जनावरांची काळजी घेणे वित्त, जीवितहानी होऊ नये, याबाबत सतर्क राहण्याचा इशारा देण्याबाबत जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु.भी. कोरके यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना सोमवारी पहाटे पत्र देऊन कळवीले आहे.

अशी वाढत गेली पाणीपातळीनिम्न दुधना प्रकल्पात पाणीपातळी शनीवारी सकाळी २४.१० टक्के होती.ती संततधार पावसाने रवीवारी रात्री ८ वा.२६.४४ टक्के अशी झाली. सोमवारी पहाटे २ वा. हि टक्केवारी ४९.९४ पर्यंत गेली.त्यानंतर २ तासांनी म्हणजे ४ वा.५५.७६ टक्के झाली. तर सकाळी ६ वा.पाणीपातळी ६१.९३ टक्के तर सकाळी ८ वा.६६.५१ टक्के तर १० वा.७०.८५ म्हणजे २४२.२०० दलघमी असा पाणीसाठा झाला.गेल्यावर्षी २ सप्टेंबर २०२३ रोजी या धरणात जिवंत पाणीसाठा २६.०७ टक्के(६३.१४२ दलघमी )होता.या तुलनेत सद्यस्थितीत ७०.५१  टक्के म्हणजे २४२.२०० दलघमी वर असा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

वाहतूक व्यवस्था ठप्प.दोन दिवसापासून जोरावर पावसाने कसुरा नदीला पुर आल्याने परभणी व पाथरी हि वाहतूक ठप्प झाली तर राजवाडी,हातनूर या मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्याने वालूर कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय परतूर मार्ग ही बंद आहे.एकंदरीत रवीवार रात्री पासून वाहतूक ठप्प आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसDamधरणparabhaniपरभणी