गळ्यातील मंगळसूत्रासह सोन्याची चेन चोरट्यांनी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:30+5:302021-02-06T04:30:30+5:30
शहरातील त्रिमूर्तीनगरात राहणारे हनुमंत कोकाटे हे कुटुंबीयांसह रात्री घरी झोपले होते. शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास चोरटे त्यांच्या घराचे चॅनल ...

गळ्यातील मंगळसूत्रासह सोन्याची चेन चोरट्यांनी लांबविली
शहरातील त्रिमूर्तीनगरात राहणारे हनुमंत कोकाटे हे कुटुंबीयांसह रात्री घरी झोपले होते. शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास चोरटे त्यांच्या घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात घुसले. घरात दाखल होताच, चोरट्यांनी कपाटातील रोख ४ हजार रुपये ताब्यात घेतले. त्या पाठोपाठ कोकाटे कुटुंबीय झोपलेल्या खोलीकडे ते गेले. त्यांच्या आवाजाने घरातील सदस्य जागे झाले होते. मात्र, चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत घरातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची चेन हिसकावून घेतली. त्याचबरोबर, दोन मोबाइल घेऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांच्या दहशतीमुळे घरातील सदस्य प्रचंड घाबरले होते. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर, पोलीस निरीक्षक रमेश स्वामी हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकालाही सकाळी पाचारण केले होते. हनुमंत कोकाटे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश स्वामी हे करीत आहेत.