लोकमान्य नगरात चोरट्यांनी लांबविली सोनसाखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST2021-07-27T04:19:08+5:302021-07-27T04:19:08+5:30
येथील लोकमान्य नगर भागातील दक्षिण मुख्य हनुमान मंदिराच्या समोर राहुल ठाकूर यांचे निवासस्थान आहे. सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या ...

लोकमान्य नगरात चोरट्यांनी लांबविली सोनसाखळी
येथील लोकमान्य नगर भागातील दक्षिण मुख्य हनुमान मंदिराच्या समोर राहुल ठाकूर यांचे निवासस्थान आहे. सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास राहुल ठाकूर यांच्या आई मीनाक्षी अशोकसिंग ठाकूर या घरासमोरील रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या झाडाजवळ उभ्या असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या युवकांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी हिसका देऊन चोरून नेली. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, गुन्हा नोंद झाला आहे.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात दोन चोरटे चोरी करीत असताना दिसत आहे. त्यामुळे या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. लोकमान्य नगर भागात भरदिवसा चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.