गोदाम फोडून चोरट्यांनी लांबविला १२ लाखांचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST2021-07-22T04:13:10+5:302021-07-22T04:13:10+5:30

येथील शिवाजी चौक भागात अब्दुल रब खत्री यांचे कापडाचे दुकान आहे. या दुकानातील व्यवसायासाठी लागणारा माल रोशन खान मोहल्ला ...

Thieves break into warehouse and steal Rs 12 lakh | गोदाम फोडून चोरट्यांनी लांबविला १२ लाखांचा ऐवज

गोदाम फोडून चोरट्यांनी लांबविला १२ लाखांचा ऐवज

येथील शिवाजी चौक भागात अब्दुल रब खत्री यांचे कापडाचे दुकान आहे. या दुकानातील व्यवसायासाठी लागणारा माल रोशन खान मोहल्ला भागातील गोदामात ठेवला होता. २० जुलैरोजी दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजण्याच्यासुमारास चोरट्यांनी गोदामाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील २ लाख २५ हजार रुपये रोख रक्कम, त्याचप्रमाणे २ लाख रुपयांच्या साड्या, ४ लाख रुपयांचे इतर कपडे तसेच ड्रेस मटेरियल असा एकूण ११ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अब्दुल रब खत्री यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश नाईक या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Thieves break into warehouse and steal Rs 12 lakh