रामनगरात चोरट्यांनी फोडले बंद घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST2021-07-25T04:16:30+5:302021-07-25T04:16:30+5:30
परभणी : शहरातील रामनगर भागात बंद असलेले घर फोडून ६३ हजार ६०० रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना २३ जुलैरोजी ...

रामनगरात चोरट्यांनी फोडले बंद घर
परभणी : शहरातील रामनगर भागात बंद असलेले घर फोडून ६३ हजार ६०० रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना २३ जुलैरोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
रामनगर येथील रहिवासी डॉ. पंढरीनाथ हरिभाऊ लखमवाड हे २१ जुलैरोजी कुटुंबीयांसह नाशिक येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. २३ जुलैरोजी दुपारी लखमवाड हे घरी परतले, तेव्हा घराचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. आत प्रवेश करून पाहणी केली असता, खोलीतील कपाट उघडे होते. त्यानंतर चोरी झाल्याचे समोर आले. याप्रकरणी लखमवाड यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी ६३ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्यंकटेश कुसुमे तपास करीत आहेत.