सहा हजार हेक्टरवरील तुरीचे पंचनामे होईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST2020-12-26T04:13:49+5:302020-12-26T04:13:49+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामात जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरातील शेतकऱ्यांनी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात ...

सहा हजार हेक्टरवरील तुरीचे पंचनामे होईनात
यावर्षीच्या खरीप हंगामात जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरातील शेतकऱ्यांनी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बहुतांश पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले. मात्र, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या हाती हे पीक लागले आहे, त्या शेतकऱ्यांनी या पिकावर मोठ्या खर्च करून हे पीक जगवले. मात्र, काढणीच्या वेळी हे तुरीचे पीक संपूर्णपणे वाया गेले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या बोरी कृषी मंडळांतर्गत येणाऱ्या १५९ शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी तालुका प्रशासनाकडे दोन आठवड्यांपूर्वी केली होती. मात्र, प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. दोन आठवडे उलटूनही पंचनामे करण्यास महसूल व कृषी विभागाचा एकही अधिकारी व कर्मचारी या पिकाकडे फिरकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाला नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात वेळ मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.