मुख्याधिकारी नसल्याने कारभार ढेपाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:29+5:302021-02-05T06:07:29+5:30
कुपटा येथे निरोप समारंभ कुपटा : येथील ज्ञानोपासक माध्यमिक व उच्च मध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक जी.एम. चव्हाण हे नुकतेच सेवानिवृत्त ...

मुख्याधिकारी नसल्याने कारभार ढेपाळला
कुपटा येथे निरोप समारंभ
कुपटा : येथील ज्ञानोपासक माध्यमिक व उच्च मध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक जी.एम. चव्हाण हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. यानिमित्त विद्यालयाच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. गणेशराव दुधगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच गोपीनाथराव सोळंके, राहुल सोळंके, दुर्गा देशमुख, उपेंद्र दुधगावकर, श्रीराम टाकळगव्हाणकर, पठाण, टेंगसे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.पी. तलवारे, सूत्रसंचालन पी.एस. काठोळे यांनी केले. आभार जी.ए. गोरे यांनी मानले.
सरपंचपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी
आलेगाव : पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथील सरपंचपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. येथील वाॅर्ड क्रमांक २ मधून निवडून आलेल्या ग्रा.पं. सदस्या गोकर्णा गोविंद सवराते या सरपंचपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. येथील सरपंच निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या वतीने सरपंचपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
१ लाख १५ हजार जणांची तपासणी
परभणी : कोरोनाच्या अनुषंगाने आतापर्यंत आरोग्य विभागाच्या वतीने १ लाख १५ हजार २९८ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ५८ हजार ८० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत, तर ५७ हजार २१८ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ९६८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत १ लाख ६ हजार ८७७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात १४ रुग्ण होम-आयसोलेशनमध्ये
परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णांना होम-आयसोलेशनमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याअंतर्गत सद्य:स्थितीत १४ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण ४३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये १३ रुग्ण परभणी शहरातील खाजगी रुग्णालयात, तर १६ रुग्ण शहरातील आयटीआय येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.