ई-पाससाठी कारणं दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST2021-05-04T04:08:19+5:302021-05-04T04:08:19+5:30

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रवेशबंदी केली आहे. १५ एप्रिलपासून ही सीमाबंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक कामासाठी ...

There are two reasons for e-pass; Hospital or funeral | ई-पाससाठी कारणं दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार

ई-पाससाठी कारणं दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रवेशबंदी केली आहे. १५ एप्रिलपासून ही सीमाबंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक कामासाठी जिल्ह्याबाहेर जाणे आवश्यक असल्यास संबंधितांना पोलीस प्रशासनाकडून ई-पास घ्यावा लागतो. मागील आठ दिवसांपासून येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-पास देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडे आतापर्यंत ३ हजार २७४ जणांनी ई-पाससाठी अर्ज केले. त्यातील सर्वाधिक अर्जांमध्ये रुग्णालय तसेच अंत्यसंस्कारासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याची कारणे दिली आहेत. त्याचप्रमाणे नोकरीवर रुजू होण्यासाठी, लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठीही नागरिकांनी ई-पास घेतले आहेत. मात्र नातेवाईक कोरोनाबाधित असल्याने परजिल्ह्यात भेटण्यासाठी जाणे, मयत नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराच्या कारणास्तव सर्वाधिक अर्जदारांनी ई-पासचा वापर केला. पोलीस प्रशासनाकडून या कागदपत्रांची तपासणी करून ई-पास दिला जातो. आतापर्यंत २ हजार २३० नागरिकांनी ई-पास मिळवित परजिल्ह्यात प्रवास केला आहे.

कोरोना तपासणी प्रमाणपत्र बंधनकारक

पोलीस प्रशासनाकडून ई-पास मिळवण्यासाठी विविध कागदपत्रे ऑनलाइन दाखल करावी लागत आहेत. त्यात अर्जदाराचा आधार क्रमांक, कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या कारणासाठी ई-पास हवा आहे, त्याची खात्री पटविणारे कागदपत्रही लागतात. ज्यात वैद्यकीय प्रमाणपत्र, लग्नपत्रिका, नोकरीवर रुजू व्हायचे असेल तर त्यासंदर्भातील आदेश आदी कागदपत्रांचा समावेश आहे.

दोन तासात मिळतो पास

ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जदाराला टोकन आयडी दिला जातो. हा टोकन आयडी जनरेट झाल्यानंतर अर्ज वैध असेल तर दोन तासातच अर्जदाराला ई-पास मंजूर केला जातो. सुरुवातीला पास देण्यासाठी विलंब लागत होता; परंतु आता दोन तासातच पास मंजूर केला जातो.

पाससाठी तीच ती कारणे

ई-पास मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या अर्जदारांनी एकच एक कारणे दिली आहेत. त्यात वैद्यकीय कारण, कोरोनाबाधित रुग्णांना भेट, कोरोनाने मृत्यू पावलेल्या नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारासाठी जाणे या कारणांचा समावेश आहे.

ई पाससाठी आलेले अर्ज : ३२७४

आतापर्यंत दिलेले पास : २२२३

प्रलंबित अर्ज : ८४

रद्द केलेले अर्ज : ९६७

Web Title: There are two reasons for e-pass; Hospital or funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.