शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'गद्दारांना पाय ठेऊ देणार नाही'; शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे परभणीत दहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 18:45 IST

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवरुन परभणीतील शिवसैनिकांमधून संतापाची लाट निर्माण झाली आहे.

परभणी: शिवसेनेशी जो नडला, त्याला शिवसैनिकांनी गाडला, गद्दारांचं करायचं काय... अशी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी शनिवारी परभणीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जिल्ह्यात कदापि पाऊल ठेऊ देणार नाही, असा दृढनिश्चिय करीत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवरुन परभणीतील शिवसैनिकांमधून संतापाची लाट निर्माण झाली आहे. या अनुषंगाने निषेध करण्यासाठी शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे छायाचित्र दोन गाढवांना लावून त्यांची धिंड काढण्यात आली. तसेच या दोन्ही नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून जोरदार घोषणाबाजी केली. ‘गद्दारांचं करायचं काय...’ ‘शिवसेनेशी जो नडला...’ अशी घोषणाबाजी करीत एकच साहेब... उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद आदी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव म्हणाले की, परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. शिवसेना हा आमचा श्वास असून पक्षाशी जो गद्दारी करेल, त्याला शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत, असेही ते म्हणाले. खासदार बंडू जाधव व आमदार डाॅ.राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात

युवासेनेचे जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, अतुल सरोदे, दीपक बारहाते, सदाशिव देशमुख, माणिकराव आव्हाड, माणिक पोंढे, पंढरीनाथ घुले, काशिनाथ काळबांडे, जितेश गोरे, मुंजा कदम, प्रदीप भालेराव, सुनील पंढरकर, संदीप झाडे, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, रामप्रसाद रणेर, भगवान धस, दगडू काळदाते, रावसाहेब रेंगे, संजय सारणीकर, सुभाष जोंधळे, पप्पू वाघ, गोविंद जाधव, प्रल्हाद लाड, जनार्दन सोनवणे, परमेश्वर सुक्रे, दामोदर घुले, सुभाष देशमुख, अरविंद देशमुख, रवी पतंगे, ओंकार शहाणे, दिनेश बोबडे, चंदु शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

मंत्रीपद देऊनही घात केला - विवेक नावंदरमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नंतर शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे खाते दिले. राज्यभरातील शहरांसाठी निधी वितरणाकरीता तिजोरीच्या चाव्या दिल्या. तरीही एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी गद्दारी केली. गुलाबराव पाटलांसह इतरांनीही हाच कित्ता गिरवला. त्यांनी पक्षनिष्ठेशी गद्दारी करुन घात केला आहे. त्यामुळे अशा गद्दारांना आगामी काळात शिवसैनिक घरचा रस्ता दाखवतील. परभणी जिल्ह्यात या गद्दारांना शिवसैनिक पाय ठेवू देणार नाहीत. ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत मान-सन्मान, मंत्रीपदे दिली, त्यांच्याशीच तुम्ही बेईमानी केली. तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. शिवसैनिक आता मात्र शांत बसणार नाही,असे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेGulabrao Patilगुलाबराव पाटीलMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ