शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांवर कारवाईसाठी वाहनांवर लग्न समारंभाचे फलक लावून पथक पोहोचले नदीपात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:57 IST

उमरा येथे दोन ट्रॅक्टर, दोन केणी जप्त : माफियांनी काढला पळ

पाथरी : उमरा येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उत्खनन होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांना मिळाली. त्यांच्या पथकाने धाड टाकून दोन ट्रॅक्टर आणि दोन केणी जप्त केल्याची कारवाई शुक्रवारी सायंकाळी केली. गौण खनिज माफियांनी तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, अधिकाऱ्यांचे शासकीय वाहन व निवासस्थान या ठिकाणी लोकेशनसाठी व्यक्ती किंवा विविध साधने यांचा वापर सुरू केला आहे. ज्यामुळे अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी खासगी वाहन किंवा वेगळी शक्कल लढवावी लागत आहे. उमरा येथील कार्यवाहीत वाहनावर लग्न समारंभाचे दर्शित फलक लावून अधिकारी व कर्मचारी अचानक गोदाकाठी पोहोचल्याने गौण माफियांनी पथकास पाहून पळ काढला.

गोदावरी नदीच्या पात्रात अवैध गौण खनिज उत्खनन विरोधी पथक विजय भादर्गे, सय्यद साजिद, सचिन साबळे, संदीप बडगुजर यांनी खासगी वाहनाद्वारे उमरा येथे होत असलेल्या अवैधरीत्या वाळू उत्खननाच्या ठिकाणी स्वत: उपविभागीय अधिकारी पाथरी शैलेश लाहोटी यांच्यासोबत जाऊन संबंधित ठिकाणावरून दोन ट्रॅक्टर, दोन केणी व अन्य साहित्य जप्त करून तहसील कार्यालयात पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी अडकून ठेवले आहे.

दुचाकीवरून केला पाठलाग...मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ढालेगाव येथून वाळू भरून पाथरी येथील वडी गावाजवळ (क्र. एमएच ०२ एक्सए ७८१०) जात असल्याची माहिती पाथरीचे तहसीलदार एस. एन. हांदेशवार यांना मिळाली. तलाठी रामप्रसाद कोल्हे यांच्यासोबत दुचाकीवरून वाहनाचा पाठलाग करून वाहन तहसील कार्यालयात आणले. वाहनात अंदाजे दोन ब्रास वाळू आढळली. वाहन दंडात्मक कार्यवाहीसाठी अडकून ठेवल्याची माहिती शैलेश लाहोटी यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीsandवाळू