शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मित्राची बर्थडे पार्टी ठरली अखेरची; अंधारात अंदाज न आल्याने युवकाचा विहिरीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 12:36 IST

काही मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु घटनेनंतर काही जण पार्टी सोडून पळून गेले; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

बोरी(परभणी) : शेतात आयोजित केेलेला मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बोरी येथे १५ मे रोजी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सतीश कल्याण चौधरी (२७) असे मृत युवकाचे नाव आहे.

या घटनेनंतर मृत सतीशचे भाऊ गजानन चौधरी यांनी बोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बोरी येथील बाळासाहेब खापरे यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील अवधेश ठाकूर यांच्या शेतातील आखाड्यावर १५ मे रोजी मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये ३५ ते ४० जणांचा सहभाग होता. याच ठिकाणी असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने सतीश कल्याण चौधरी हा विहिरीत पडला. काही जणांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर विशाल ईखे यांनी तत्काळ विहिरीमध्ये उडी मारून दोरीच्या सहाय्याने सतीश चौधरी यास काठावर घेतले. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु घटनेनंतर काही जण पार्टी सोडून पळून गेले, असे गजानन चौधरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस निरीक्षक वसंत मुळे, उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, पतंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सतीश चौधरी याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली होती. त्यानंतर गजानन चौधरी यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब खापरे, अवधेश ठाकूर, संदीप कदम या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वसंत मुळे तपास करीत आहेत. सतीश चौधरी यांच्या पार्थिवावर १६ मे रोजी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश चौधरी यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान चौधरी यांचे ते पुतणे होत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूparabhaniपरभणी