शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

आरक्षणाची मागणी; तहसीलमध्ये कामकाज सुरू असताना बाहेरून कडी लावत पेटवले प्रवेशद्वार

By ज्ञानेश्वर भाले | Updated: November 1, 2023 17:46 IST

कर्मचारी तहसील कार्यालयात कामकाज करत असताना आक्रमक आंदोलन

परभणी  :मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेदिवस तीव्र होत असल्याची जिल्ह्यात स्थिती आहे. आत्महत्येच्या सत्रानंतर बुधवारी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, अशा  घोषणा देत पूर्णा तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. संबंधित घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली असून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात २६ ऑक्टोबरपासून उपोषण, आंदोलने करण्यात येत आहे. परंतु, सरकार पातळीवर याबाबत ठोस निर्णय हाेत नसल्याने मराठा समाज बांधवाच्या संयमाचा बांध आता फुटत असल्याचे पुढे येत आहे. त्यातच बुधवारी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ तरुणांनी पुर्णा तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारे पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यासह काही दिवसांपुर्वी जिल्ह्यातील आजी, माजी आमदारांना मराठा समाज बांधवाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चार जणांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनकर्ते आक्रमक भूमिका घेत असल्याची स्थिती असून ठिकठिकाणी रस्ता रोको, जाळपोळ होत असल्याचे पुढे येत आहे.

बाहेरुन लावली कडीबुधवारी सकाळी नियमितपणे कर्मचारी तहसील कार्यालयात कामकाज करत हाेते. यादरम्यान सकाळी साडेअकराला काही तरुणांनी पेट्रोलने भरलेल्या प्लास्टिक पिशव्या तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर फेकत आग लावली. कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. याप्रकरणी तहसीलदार माधवराव बोथीकर म्हणाले की, तहसीलचे प्रवेशद्वार अज्ञातांकडून जाळण्याचा प्रयत्न झाला असून यादरम्यान प्रवेशद्वारला बाहेरून कडी लावण्यात आली होती.

टॅग्स :parabhaniपरभणीMaratha Reservationमराठा आरक्षण