शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

'संपूर्ण प्रशासन गाफील राहिल्यानेच हिंसाचार; आता पोलिसांची कोम्बिंग ऑपरेशनखाली दहशत"

By विजय पाटील | Updated: December 13, 2024 18:41 IST

हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि निरपराध व्यक्तींवरील कायदेशीर कारवाई थांबवावी, अशी मागणी नितीन राऊत यांनी केली

परभणी : शहरातील पुकारलेल्या बंददरम्यान संपूर्ण प्रशासन गाफील राहिल्यानेच हिंसाचार घडला असून पोलीस यंत्रणा कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी  पत्रकार परिषदेत केला. तसेच झालेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि निरपराध व्यक्तींवरील कायदेशीर कारवाई थांबवावी, अशी मागणीही केली.

याप्रसंगी माजी आमदार सुरेश वरपूडकर, अनुसुचित जाती-जमाती विभागाचे अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिरे, विजय वाकोडे, भीमराव हत्तीअंबिरे, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, डॉ.सिध्दार्थ भालेराव,  सुरेश गायकवाड, गौतम गवई, सुहास पंडित आदी उपस्थित होते.

राऊत म्हणाले की, भारतीय संविधानाच्या शिल्पाची तोडफोड  करणार्‍याची कसून चौकशी करावी, त्याला कोणी चिथावणी दिली होती का, हे तपासावे जेणेकरून या प्रकरणामागचा मास्टरमाईंड कोण आहे? हे समोर येईल. बंददरम्यान झालेली जाळपोळ, दगडफेक हे प्रकार घडायला नको होते. मात्र पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कार्यरत असतानाही केवळ जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या गाफीलपणामुळे हिंसाचार झाल्याचा आरोप करत त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सुरक्षा नसल्यानेच हा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला. 

आंबेडकरी कार्यकर्त्यांना लक्ष्यहिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ९ एफआयआर दाखल केले असून ५२ जणांवर कारवाई केली आहे. ४०० जणांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदविला आहे. हिंसाचार करणारे तोंड बांधून आले होते, ते कुठले होते, याचाही शोध घ्यावा आणि निरपराध व्यक्तींवर कारवाई करून निर्माण केली जात असलेली दहशत थांबवावी. एका युवकाला ४ ते ५ पोलिस घरावर जाऊन मारहाण करीत असल्याचा व्हिडीओही त्यांनी मोबाईलवर पत्रकारांना दाखवला. आंबेडकरी कार्यकर्त्यांना यात लक्ष्य केले जात असल्याचाही आरोप राऊत यांनी केला.

टॅग्स :parabhaniपरभणीNitin Rautनितीन राऊतPoliceपोलिस