रेवणअप्पा साळेगावकर /सेलू (परभणी) : सेलू ते परभणी मार्गावरील वालूर जोड रस्त्यावर शनिवारी (दि. २१) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
प्राप्त माहितीनुसार, दुचाकी (MH ०९ – BN ८४३३) आणि हायवा ट्रक (MH २२ – AN ९७५५) यांच्यात वालूर जोड रस्त्यावर अपघात झाला. हायवा ट्रकने दुचाकीला मागील बाजूने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार रखमाजी नामदेव थोरात (वय ५५, रा. डुघरा) हे दुचाकीसह ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सहप्रवासी जखमी
या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी बबन कचरू सिरसाट (वय 49, रा. कुपटा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, सेलू येथे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट, पोलीस उपनिरीक्षक शाकेर शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किर्तेश्वर तेलंगे, पोलीस हवालदार उस्मान शेख, पोलीस हवालदार सुरेश पुलाते आणि पोलीस नाईक कांगणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्ती व मृतदेह राहुल कांबळे यांच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, सेलू येथे हलवण्यात आला.
अपघातग्रस्त दोन्ही वाहने पुढील तपासासाठी सेलू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली.
मृतक रखमाजी थोरात हे डुघरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेनंतर डुघरा गावात शोककळा पसरली आहे.
Web Summary : A tragic accident on the Selu-Parbhani road claimed one life and seriously injured another. A speeding truck collided with a motorcycle near Walur, resulting in the immediate death of Rakhmaji Thorat. The injured passenger, Baban Sirsat, is receiving treatment. Police are investigating.
Web Summary : सेलू-परभणी मार्ग पर वालूर के पास एक दुखद दुर्घटना में एक व्यक्ति की जान चली गई और एक गंभीर रूप से घायल हो गया। तेज गति से आ रहे ट्रक ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे रखमाजी थोरात की मौके पर ही मौत हो गई। घायल यात्री बबन सिरसत का इलाज चल रहा है। पुलिस जांच कर रही है।