जिल्ह्यात कोरोनाने दहा रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST2021-05-18T04:18:37+5:302021-05-18T04:18:37+5:30

मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. रुग्ण संख्या कमी झाली असली तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या ...

Ten patients died of corona in the district | जिल्ह्यात कोरोनाने दहा रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाने दहा रुग्णांचा मृत्यू

मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. रुग्ण संख्या कमी झाली असली तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. १७ मे रोजी एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील २, आयटीआय हॉस्पिटलमधील ४, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयातील १ आणि खासगी रुग्णालयातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ९ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

सोमवारी आरोग्य विभागाला १ हजार ७०५ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या १ हजार ७०५ अहवालांमध्ये २१० आणि रॅपिड टेस्टच्या ३१८ अहवालांमध्ये ७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ४४८ झाली असून, त्यापैकी ४२ हजार ६५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार १४१ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. सध्या २ हजार ६५२ रुग्ण उपचार घेत आहेत.

६५० रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सोमवारी ६५० रुग्णांची रुग्णालयातून सुट्टी झाली.

Web Title: Ten patients died of corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.