पोलीस दलात दाखल झाली दहा नवी वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST2021-04-13T04:16:24+5:302021-04-13T04:16:24+5:30
पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काही दिवसांपूर्वी मोटार परिवहन विभागाची बैठक घेतली होती. या विभागाचे पोलीस निरीक्षक रमाकांत बनसोडे ...

पोलीस दलात दाखल झाली दहा नवी वाहने
पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काही दिवसांपूर्वी मोटार परिवहन विभागाची बैठक घेतली होती. या विभागाचे पोलीस निरीक्षक रमाकांत बनसोडे व पर्यवेक्षक सय्यद साजीद हुसेन यांच्याकडून घेतलेल्या आढाव्यात पोलीस दलासाठी वाहनांची कमतरता असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर नवीन वाहने खरेदी करण्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. जिल्हा नियोजन समितीकडून ७१ लाख २ हजार रुपयांचा निधी वाहनांसाठी उपलब्ध करण्यात आला. या निधीतून महिंद्रा बोलेरो कंपनीची चारचाकी १० वाहने खरेदी करण्यात आली. ७ लाख १० हजार १४६ रुपयांना एक वाहन याप्रमाणे वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. सोमवारी ही वाहने परभणी पोलीस निरीक्षक कार्यालयात दाखल झाली. लवकरच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना वाहने सुपूर्द केली जाणार आहेत. दरम्यान, नवी वाहने दाखल झाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस उपनिरीक्षक सुनील ओव्हाळ, सय्यद साजीद हुसेन, सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ, पाटील, अशोक कदम, पारवेकर, जी. जी. पठाण, भागवत, सय्यद हैदर, डी. एस. घाग, प्रशांत कुलथे, एम. एस. करले, बिराजदार, अन्वर पठाण, दीपक मुंडे, गणेश कौटकर आदींची उपस्थिती होती.