टेम्पो उलटून तीन बैल ठार; चालक जखमी
By Admin | Updated: June 11, 2017 00:15 IST2017-06-11T00:13:10+5:302017-06-11T00:15:45+5:30
पाथरी : टेम्पोचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात ३ बैल ठार झाल्याची घटना तालुक्यातील बाभळगाव फाटा येथे १० जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

टेम्पो उलटून तीन बैल ठार; चालक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : टेम्पोचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात ३ बैल ठार झाल्याची घटना तालुक्यातील बाभळगाव फाटा येथे १० जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
एम एच१९/झेड ३७४० या क्रमांकाचा टेम्पो शनिवारी सकाळी जळगाव येथून जनावरे विक्रीसाठी गंगाखेडकडे निघाला. टेम्पोत १३ बैल होते. हा टेम्पो पाथरी - सोनपेठ रस्त्यावरील बाभळगाव फाटा येथे आल्यानंतर टेम्पोचा स्टेअरिंग रॉड तुटला. त्यामुळे टेम्पो रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. या अपघातामध्ये ३ बैल जागीच ठार झाले. तर इतर बैल जखमी झाले. तसेच चालकलाही मार लागला असून त्यास तातडीने पाथरी येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे. दरम्यान, पाथरीचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत नोंद घेण्यात आली नव्हती.