जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांच्या संपर्कातील नागिरकांना शोधण्याचे काम शिक्षकांवर सोपविण्यात आले आहे, परंतु हे काम दिले जात असताना, शहरी भागातील शिक्षक अथवा मनपा हद्दीतील इतर कर्मचाऱ्यांना वगळून ग्रामीण भागातील शिक्षकांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक शिक्षकांना शहरातील नागरिकांची माहिती नसते, परंतु असे असतानाही हे शिक्षक शहरी भागात काम करीत आहेत.
हे काम करीत असताना शिक्षकांना कोणतेही सुरक्षा कवच देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक जण कोरोनाबाधित झाले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील शिक्षकांना किंवा इतर कर्मचाऱ्यांना ही कामे देण्याऐवजी जिल्हा परिषदेतील शिक्षकांची नियुक्ती करणे अन्यायकारक आहे. यास शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांना ग्रामीण भागातीलच कामे द्यावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.