परभणी : वाहन परवान्यासाठी ऑनलाईन नोंदणी झालेल्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घ्या, ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणारी प्रक्रिया बंद करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन करण्यात आले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत लॉकडाऊन काळातील वाहन परवाना नोंदणी अनेकांची झालेली आहे. यामध्ये हजारो वाहन परवाना अर्ज प्रलंबित आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणी उपलब्ध नाही. मात्र सध्या ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविली जात आहे. तसेच शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी वाहन परवाना देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र ही प्रक्रिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातील ड्रायव्हिंग ट्रॅकवर न घेता एमआयडीसी परिसरात घेतली जात आहे. या दोन्ही बाबी त्रासदायक ठरत आहेत. याविरोधात गंगाधर यादव, कृष्णा कटारे, संदीप सोळुंके, शेख उस्मान कुरेशी, दीपक वाघमारे, किरण डाके, अभिजीत काळे, यांनी आंदोलन केले.