लाखो रुपयांची यंत्रणा धूळ खात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:16 IST2021-04-12T04:16:05+5:302021-04-12T04:16:05+5:30
वाहनतळांवर अतिक्रमणे वाढली परभणी : शहरातील बाजारपेठ भागात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी मनपा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी वाहनतळाच्या जागा ...

लाखो रुपयांची यंत्रणा धूळ खात पडून
वाहनतळांवर अतिक्रमणे वाढली
परभणी : शहरातील बाजारपेठ भागात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी मनपा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी वाहनतळाच्या जागा निश्चित केल्या होत्या. मात्र या वाहनतळांवर अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे सम-विषम वाहनतळाची सुविधा बारगळली आहे. बाजारपेठ भागात वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने वाहनधारक दुकानासमोरच वाहने उभी करतात. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
परभणी : येथील ममता कॉलनी पाण्याची टाकी ते उघडा महादेव या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वृंदावन कॉलनी परिसरातील अनेक वसाहतींतील नागरिकांसाठी हा प्रमुख रस्ता असून, खड्डा बुजविण्याची मागणी होत आहे. शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. मागील दोन वर्षांपासून शहरात रस्ते निर्मितीची कामे झाली नाहीत. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी वाहनधारक त्रस्त आहेत.