मास्कमुळे येणारा घाम नियमित पुसणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST2021-07-28T04:18:27+5:302021-07-28T04:18:27+5:30
मास्क आवश्यकच, पण असे करा त्वचेचे रक्षण...! सर्वसाधारणपणे बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाताना दोन मास्कचा वापर करावा. कापडी मास्क नियमित ...

मास्कमुळे येणारा घाम नियमित पुसणे गरजेचे
मास्क आवश्यकच, पण
असे करा त्वचेचे रक्षण...!
सर्वसाधारणपणे बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाताना दोन मास्कचा वापर करावा. कापडी मास्क नियमित धुवावा.
कापडी मास्क आतून आणि सर्जिकल मास्क बाहेरून वापरला पाहिजे. शक्यतो सुती मास्कचा वापर करावा.
एन-९५ मास्क वापरताना किमान चार तासांतून एक वेळा ब्रेक देऊन घाम पुसणे आवश्यक आहे.
नागरिकांनी ही घ्यावी काळजी
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या मास्कवरून फुंकर घातल्यानंतर मेणबत्ती पहिल्याच फुंकरमध्ये विझत नाही, असाच मास्क वापरावा, तसेच मास्क नियमित धुणे, तोंडावर येणारा घाम वारंवार पुसणे याबाबीही महत्त्वपूर्ण ठरतात. अन्यथा घामामुळे चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात. - डॉ. संजय जोगड, त्वचारोग तज्ज्ञ
सॅनिटायझरपेक्षा साबण बरे
साबण आणि पाणी उपलब्ध असल्यास साबणाने हात धुण्यास प्राधान्य द्यावे.
वरील पर्याय उपलब्ध नसल्यास सॅनिटायझरचा वापर करावा.
वारंवार सॅनिटायझर वापरल्यास मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे.