जिल्ह्यात नागरिकांना उन्हाळ्याची चाहुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:34+5:302021-02-05T06:06:34+5:30
पिकांवर किडींचा प्रादुर्भाव परभणी : जिल्ह्यात वातावरणात बदल झाला असून, दिवसा कडक ऊन तर रात्री गारवा निर्माण होत आहे. ...

जिल्ह्यात नागरिकांना उन्हाळ्याची चाहुल
पिकांवर किडींचा प्रादुर्भाव
परभणी : जिल्ह्यात वातावरणात बदल झाला असून, दिवसा कडक ऊन तर रात्री गारवा निर्माण होत आहे. या विचित्र वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव निर्माण होत आहे. गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांवर कीड व रोग पडत असल्याने शेतकरी या किडीच्या व्यवस्थापनामध्ये गुंतले आहेत.
सवारी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी
परभणी : रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सुरू करून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर केली आहे. मात्र, अजूनही सवारी रेल्वेगाड्या सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे जिल्हाअंतर्गत आणि शेजारील जिल्ह्यात दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय कायम आहे. सवारी रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.
शाळांमध्ये वाढली विद्यार्थ्यांची उपस्थिती
परभणी : जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, नियमितपणे शाळा सुरू झाल्या आहेत.
नवीन वसाहतीमध्ये सुविधांचा अभाव
परभणी : शहरालगत असलेल्या नवीन वसाहतींमध्ये सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. रस्ते, नाल्या आणि विजेची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मनपाविषयी रोष व्यक्त केला जात आहे. मनपा प्रशासनाने नव्या वसाहतीत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.