प्रेमसंबंधातून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:56+5:302021-06-26T04:13:56+5:30

विष्णू पांडुरंग गोंडगे (रा. सोगाव पूर्व, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी सेलू पोलीस स्टेशनला खबर दिली असून यामध्ये स्वप्नील ...

Suicide of a young man in a love affair | प्रेमसंबंधातून तरुणाची आत्महत्या

प्रेमसंबंधातून तरुणाची आत्महत्या

विष्णू पांडुरंग गोंडगे (रा. सोगाव पूर्व, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी सेलू पोलीस स्टेशनला खबर दिली असून यामध्ये स्वप्नील घाडगे (२०) हा शिक्षण घेत होता. स्वप्नील याने टेलिग्रामवरून एमपीएससी ग्रुपमधील वडवणी (जि. बीड) येथील एका २१ वर्षीय तरुणीसोबत सूत जुळले होते. त्यानंतर प्रेमसंबंध असलेल्या या तरुणीसोबत सोयरीक होत नसल्याच्या कारणाने २३ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सेलू शहरातील राजाराम नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्वप्नील घाडगे याने कीटकनाशक औषध प्राशन केले. या घटनेत स्वप्नीलचा जागीच मुत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोटीतीर्थवाले, जमादार एस. एस. वासलवार, पो.हे. कॉ बी. जी. पुरणवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी विष्णू पांडुरंग गोंडगे यांच्या तक्रारीवरून सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Suicide of a young man in a love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.