तिवठाणा येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:23+5:302021-02-05T06:06:23+5:30

गंगाखेडपासून जवळच असलेल्या सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा येथील चंद्रकांत उर्फ मुंजाजी भगवान धोंडगे (वय ३० वर्षे) यांनी २ फेब्रुवारी रोजी ...

Suicide of a young farmer in Tiwathana | तिवठाणा येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

तिवठाणा येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

गंगाखेडपासून जवळच असलेल्या सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा येथील चंद्रकांत उर्फ मुंजाजी भगवान धोंडगे (वय ३० वर्षे) यांनी २ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.२४च्या सुमारास विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यापूर्वी ‘मला पैशांमुळे धमक्या येत आहेत, म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करावा, उद्या सकाळी माती आहे, सर्वांनी यावे, पैशांमुळे मला त्रास झाला आहे,’ असे वेगवेगळे मजकूर लिहिलेल्या तीन चिठ्ठ्या त्यांनी लिहून ठेवल्या होत्या, तसेच १२.२४ वाजता ‘मी शेतात आहे’ असा संदेश टाइप करून मोबाइलच्या स्टेटसवर ठेवला होता. ही माहिती समजताच मयत तरुणाचे चुलते हनुमान गणपतराव धोंडगे यांनी शेतात जाऊन चंद्रकांत धोंडगे यांना दुपारी १:३५ वाजता गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती मुंडे यांनी त्यास मृत घोषित केले. मयत ्चंद्रकांत धोंडगे याच्यापश्चात पत्नी, सहा वर्षीय मुलगा, दोन वर्षीय मुलगी, एक भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. गंगाखेड पोलीस ठाण्याचे जमादार एम.जी. सावंत, जमादार गोविंद मुरकुटे यांनी शवविच्छेदनापूर्वी पंचनामा केला, तसेच कागदपत्रे सोनपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले.

(नोट- बोल्ड केलेल्या चंद्रकांत या नावापुढे एक अनावश्यक चिन्ह पडलं आहे, जे डीलिट होत नाहीए, कृपया पाहणे.)

Web Title: Suicide of a young farmer in Tiwathana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.