धर्मापुरी येथील युवकाची गंगाखेडच्या लॉजमध्ये आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 19:05 IST2018-06-27T19:04:52+5:302018-06-27T19:05:32+5:30
बस स्थानकाजवळील एका लॉजमध्ये धर्मापुरी येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

धर्मापुरी येथील युवकाची गंगाखेडच्या लॉजमध्ये आत्महत्या
गंगाखेड (परभणी ) : येथील बस स्थानकाजवळील एका लॉजमध्ये धर्मापुरी येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संतोष नामदेव हाके (२३ ) असे मृताचे नाव आहे.
मंगळवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान बस स्थानकासमोरील एका लॉजमध्ये संतोष हाके (रा. हाके गल्ली धर्मापुरी ता. परळी जि. बीड) याने रूम घेतली. आज सकाळी रूमची सफाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याने संतोष याच्या रूमचे दार वाजवले मात्र त्याने दार उघडले नाही. यानंतर सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत त्याने दरवाजा उघडला नाही. यामुळे लॉज मालक हिरा मेहता यांनी १२ वाजेच्या सुमारास याची माहिती गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली.
पोउपनि भाऊसाहेब मगरे, रवि मुंडे, जमादार सुलक्षण शिंदे, पोशि माणिक वाघ, योगेश गयाळ, सुग्रीव कांदे, शेख जिलानी, विष्णु वाघ आदी पोलीस कर्मचारी लॉज वर पोहचले. रूम मधून प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी संतोषचा भाऊ दिपक हाके यांच्याशी संपर्ककरून त्यांना लॉजवर बोलवून घेतले. यानंतर दीपक हाके यांच्या समोर रूमचा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी संतोषने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार सुलक्षण शिंदे करत आहेत.